News Flash

Euro Cup 2020 : स्लोवाकियाची पोलंडवर २-१ ने मात

स्लोवाकियाची 'ई' गटात विजयी सुरुवात

Euro Cup 2020 : पोलंड वि. स्लोवाकिया

यूरो कप स्पर्धेला दणदणीत सुरुवात झाली आहे. आज सोमवारी ई गटातील सामन्यात पोलंड आणि स्लोवाकिया हे दोन संघ आमनेसामने आले होते. या गटातील पहिल्या सामन्यात स्लोवाकियाने सुपरस्टार रॉबर्ट लेवांडोव्स्कीच्या पोलंडचा २-१ असा पराभव केला. सेंट पीटर्सबर्गच्या क्रेस्टोव्स्की स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. सामन्याच्या पहिल्या सत्रात स्लोवाकियाने एक गोल करत आघाडी घेतली होती, मात्र दुसऱ्या सत्रात पोलंडने बरोबरी साधली. ६९व्या मिनिटाला स्क्रिनियारने दुसरा गोल केल्याने स्लोवाकियाने ही आघाडी शेवटपर्यंत राखली.

दुसरे सत्र

दुसऱ्या सत्रात पोलंडने पुनरागमन करत पहिला गोल केला. कारोल लिनेट्टीने ४६व्या मिनिटाला गोल करत स्लोवाकियाशी बरोबरी साधली. सामन्याच्या ६२व्या मिनिटाला क्रिचिवीओकच्या चुकीमुळे दुसरे पिवळे कार्ड दाखवण्यात आले. क्रिचिवीओक बाहेर गेल्याच्या सात मिनिटानंतर स्लोवाकियाने आपले आक्रमण वाढवत अजून एक गोल करत आघाडी घेतली. स्क्रिनियारने हा गोल नोंदवला. स्लोवाकियाने आपला बचाव आणि आक्रमण यांचे सुंदर मिश्रण करत ही आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. अतिरिक्त वेळेत पोलंडला बरोबरी साधण्याची संधी मिळाली होती, पण त्यांना गोल करण्यात अपयश आले.

पहिले सत्र

स्लोवाकियाने सुरुवातीपासूनत पोलंडवर आक्रमण करण्यास सुरुवात केली. पहिल्या १० मिनिटांच्या आत पोलंडला गोल करण्यासाठी अनेक संधी मिळाल्या, पण त्यांचे खेळाडू अपयशी ठरले. सामन्याच्या १३व्या मिनिटाला स्लोवाकियाने गोल करण्याची संधी चुकवली. पण रॉबर्ट माकने १८व्या मिनिटाला पोलंडच्या तीन बचावपटूंना भेदत स्लोवाकियासाठी पहिला गोल केला. त्यानंतर टॉमस हुबॉकॉला पहिले पिवळे कार्ड मिळाले. २१व्या मिनिटाला पोलंडच्या क्रिचिवीओकने स्लोवाकियाच्या खेळाडूला पाडल्यामुळे त्याला पिवळे कार्ड दाखवण्यात आले. पहिले सत्र संपेपर्यंत स्लोवाकियाचा संघ अधिक चपळ दिसून आला. पहिल्या सत्रात पोलंडने ७ तर स्लोवाकियाने ६ फाऊल केले.

 

३२ वर्षीय दिग्गज फुटबॉलपटू लेवांडोव्स्की पोलंडच्या संघाचा स्टार खेळाडू आहे. बायर्न म्युनिक या क्लबसाठी लेवांडोव्स्कीने मोठे योगदान दिले आहे. म्युनिकसाठी यंदाच्या हंगामात लेवांडोव्स्कीने ४८ गोल केले आहे. दुसरीकडे स्लोवाकियाचा कर्णधार मारेक हाम्सिकही या सामन्यात मोठी कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असेल. नापोली क्लबाठी खेळणाऱ्या हाम्सिकने आपल्या संघाकडून सर्वाधिक गोल नोंदवणारा खेळाडू आहे.

 

 

हेही वाचा – Euro Cup 2020: रशियातील करोना स्थितीची बेल्जियम संघाला धास्ती; मागितली घरच्या मैदानावर सरावाची परवानगी

हेड-टू-हेड आकडेवारी

आत्तापर्यंत या दोघांमध्ये झालेल्या ८ सामन्यात स्लोवाकियाचा संघ पोलंडपेक्षा वरचढ ठरला आहे. पोलंडने ३ तर स्लोवाकियाने ४ विजय नोंदवले आहे. तर दोघांमधील १ सामना बरोबरीत सुटला होता. या दोन्ही संघांमधील शेवटचा सामना २०१३मध्ये झाला होता. यात स्लोवाकियाने २-० असा जिंकला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2021 7:38 pm

Web Title: uefa euro cup 2020 poland vs slovakia match report adn 96
Next Stories
1 WTC Final: विजेत्या संघाला मिळणार ११.७२ कोटीचं बक्षीस!
2 Euro Cup 2020: रशियातील करोना स्थितीची बेल्जियम संघाला धास्ती; मागितली घरच्या मैदानावर सरावाची परवानगी
3 Euro Cup 2020 Live: चेक रिपब्लिकच्या आक्रमक खेळीपुढे स्कॉटलँडचा संघ गारद
Just Now!
X