News Flash

यूएफा सुपर चषक फुटबॉल : बायर्न म्युनिकला जेतेपद

मोजक्या प्रेक्षकांसह रंगलेल्या या लढतीत बायर्न म्युनिकने अतिरिक्त वेळेत जेतेपद संपादन केले.

(संग्रहित छायाचित्र)

 

जावी मार्टिनेझच्या निर्णायक गोलमुळे बायर्न म्युनिकने सेव्हियाचा २-१ असा पराभव करत यूएफा सुपर चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

मोजक्या प्रेक्षकांसह रंगलेल्या या लढतीत बायर्न म्युनिकने अतिरिक्त वेळेत जेतेपद संपादन केले. मार्टिनेझने १०४व्या मिनिटाला गोल करत बायर्नच्या जेतेपदावर मोहोर उमटवली. तब्बल सात वर्षांनंतर बायर्नने सुपर चषकाचे जेतेपद पटकावले.

डेव्हिड अलाबाने मारलेला फटका सेव्हियाचा गोलरक्षक यासिन बोऊनोऊ याने परतवून लावल्यानंतर मार्टिनेझने परतीच्या फटक्यावर गोल लगावला. हाच गोल सामन्यात निर्णायक ठरला.

युरोपा लीग विजेत्या सेव्हियाने सुरुवातीलाच सामन्यात आघाडी घेतली होती. डेव्हिड अलाबाच्या चुकीमुळे १३व्या मिनिटाला सेव्हियाला पेनल्टी-किक मिळाली होती. त्यावर लुकास ओकाम्पोस याने कोणतीही चूक न करता सेव्हियाचे खाते खोलले होते. त्यानंतर ३४व्या मिनिटाला लेऑन गोरेट्झका याच्या गोलच्या बळावर बायर्न म्युनिकने बरोबरी साधली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 12:03 am

Web Title: uefa super cup football bayern munich win the super cup abn 97
Next Stories
1 न्यूझीलंडमध्येही रंगणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट, मालिका खेळवण्यास सरकारची परवानगी
2 विराट-अनुष्कावरील ‘त्या’ वक्तव्यावर सुनील गावसकरांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
3 फ्रेंच खुली पात्रता टेनिस स्पर्धा : अंकिताचे आव्हान संपुष्टात
Just Now!
X