जगभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, आयपीएलच्या आयोजनात Bio Secure Bubble म्हणजेच प्रतिजैविक सुरक्षा कवच तयार करण्याचं कंत्रात UK स्थित रेस्ट्राटा या कंपनीला देण्यात आलं आहे. Tata उद्योगसमुहाला मागे टाकून रेस्ट्राटा कंपनीने हे कंत्राट मिळवलं आहे. एखादी स्पर्धा किंवा मोठ्या कार्यक्रमासाठी प्रतिजैविक सुरक्षा कवच तयार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या कंपनीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि २०१२ साली लंडन ऑलिम्पिक्समध्ये काम केलं आहे. काही दिवसांपूर्वीच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानविरुद्ध मालिकेसाठी Bio Secure Bubble तयार करण्याची जबाबदारी या कंपनीला दिली होती. या अनुभवाच्या जोरावर बीसीसीआयनेही IPL च्या आयोजनाचं कंत्रात रेस्ट्राटा कंपनीला दिलं आहे.

याआधी क्रीडा स्पर्धांसाठी काम करण्याचा अनुभव, प्रामुख्याने क्रिकेट स्पर्धांचा अनुभव आणि Tata समुहाच्या तुलनेत कमी खर्चात Bio Secure Bubble तयार करण्याची हमी दिल्यानंतर रेस्ट्राटा कंपनीला हे कंत्राट मिळालं आहे. बीसीसीआयने सर्व संघमालकांना याबद्दल माहिती दिली असून UAE मध्ये खेळाडू व इतर स्टाफच्या प्रवासापासून राहण्याच्या जागेवर सर्व नियमांचं पालन होतंय की नाही आणि कोणत्याही प्रकारे करोनाविषयक नियमांचं उल्लंघन होणार नाही याची जबाबदारी आता रेस्ट्राटा कंपनीकडे असणार आहे.

BMC Recruitment 2024
बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदासाठी निघाली मोठी भरती! ९० हजारपर्यंत मिळू शकतो पगार
Paris Olympics Opening ceremony faces major changes
ऑलिम्पिक सोहळा पुन्हा स्टेडियममध्ये? सुरक्षेचा धोका असल्याची फ्रान्सच्या अध्यक्षांना भीती
Champions League T20 to resume
Champions League T20 : १० वर्षांनंतर चॅम्पियन्स टी-२० लीग खेळवली जाणार? भारतासह ‘या’ तीन देशांनी दाखवले स्वारस्य
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

टाइम्स ऑफ इंडियाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिजैविक सुरक्षा कवच तयार करण्यासाठी Tata समुहाने रेस्ट्राच्या दुप्पट खर्च सांगितला होता. आयपीएलमधील एका संघमालकाने Tata समुहाचं नाव बीसीसीआयला सुचवलं होतं. “पण सध्याच्या परिस्थितीत शिफारस पुरेशी नाही. मोठी स्पर्धा आयोजित करताना अनुभव महत्वाचा आहे. रेस्ट्राटा कंपनीला एका सामन्यासाठी ५०० लोकं, खेळाडू आणि इतर स्टाफचं नियोजन करण्याचा अनुभव आहे. या प्लानचं सादरीकरणही त्यांनी आम्हाला केलं. तसेच या कामात रेस्ट्राटा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन हे प्रतिजैविक सुरक्षा कवच तयार करणार आहे.” याच कारणामुळे रेस्ट्राटा कंपनीला हे कंत्राट देण्यात आल्याचं बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितलं. स्पर्धा सुरु झाल्यानंतर प्रतिजैविक सुरक्षा कवच (Bio Secure Bubble) चे खास नियम तयार होतील. प्रत्येक संघांना ते पाळणं बंधनकारक असणार आहे.

अवश्य वाचा – चिनी कंपनीच्या गुंतवणूकीनंतरही Dream 11 ला IPL स्पॉन्सरशिप, BCCI म्हणतं…