25 February 2021

News Flash

तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण झाल्यामुळे उमेश भारतीय संघात

मोटेरा येथे रविवारी उमेश तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण झाला,

(संग्रहित छायाचित्र)

तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण झाल्यामुळे वेगवान गोलंदाज उमेश यादवचा सोमवारी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. अहमदाबाद येथे होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी उमेशच्या खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे शार्दूल ठाकूरला विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेसाठी मुंबई संघाकडून खेळण्यासाठी मुक्त करण्यात आले आहे. मोटेरा येथे रविवारी उमेश तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण झाला, असे ‘बीसीसीआय’कडून सांगण्यात आले. डिसेंबरमध्ये मेलबर्न येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात उमेशच्या पोटरीचा स्नायू दुखावल्याने त्याला उर्वरित मालिकेतून माघार घ्यावी लागली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2021 12:11 am

Web Title: umesh joins indian team after passing fitness test abn 97
Next Stories
1 आनंद ‘ग्लोबल चेस लीग’चासूत्रधार
2 मंगळ ग्रहावर क्रिकेट खेळवण्याची ICC ची तयारी अन् नेटकऱ्यांचे ‘फ्री हिट’
3 ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : जोकोव्हिच सत्ताधीश!
Just Now!
X