अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात करत मालिकेत बरोबरी साधली आहे. टीम इंडियाने विजय मिळवला असला तरीही संघासमोरील अडचणी काहीकेल्या कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. दुसऱ्या डावात गोलंदाजी करत असताना उमेश यादवला दुखापत झाल्यामुळे त्याला स्कॅनिंग व इतर वैद्यकीय चाचण्यांसाठी मैदानाबाहेर नेण्यात आलं.

अवश्य वाचा – पिछली बार क्या बोला था? व्हाईटवॉश?? टीम इंडियाला डिवचणाऱ्या वॉनला जाफरचं प्रत्युत्तर

ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, “उमेश यादवच्या स्कॅनिंगचे रिपोर्ट आले आहेत. उमेश तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. अखेरच्या कसोटी सामन्यापर्यंत तो दुखापतीपर्यंत सावरतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण १५ जानेवारीपासून खेळवण्यात येणाऱ्या अखेरच्या कसोटी सामन्याआधी बरं व्हायला त्याला फार कमी वेळ आहे”, सूत्रांनी माहिती दिली.

अवश्य वाचा – भारताच्या विजयात बुमराह चमकला, अनिल कुंबळेच्या कामगिरीशी बरोबरी

उमेश यादव तिसऱ्या किंवा अखेरच्या कसोटीपर्यंत बरा न झाल्यास संघ व्यवस्थापन टी. नटराजनला संधी देण्याचा विचार करु शकतं अशीही माहिती सूत्रांनी दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे आणि टी-२० मालिकेत नटराजनने प्रभावी कामगिरी केली होती. ज्यामुळे त्याला पर्यायी खेळाडू म्हणून कसोटी मालिकेकरताही ऑस्ट्रेलियातच थांबवण्यात आलं होतं.

अवश्य वाचा – मराठमोळ्या रहाणेचा बहुमान, मानाचं Mullagh Medal पटकावणारा पहिला खेळाडू