विंडीजचा तडाखेबंद फलंदाज ख्रिस गेलने इंग्लंडविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात संघामध्ये पुनरागमन केलं. तब्बल 18 महिन्यांनी पुनरागमन करताना गेलने शतकी खेळी केली. 135 धावांची शतकी खेळी करताना गेलने तब्बल 12 षटकार लगावले. मात्र त्याच्या या पुनरागमनामुळे पंच चांगलेच त्रस्त झाले. गेलच्या 12 पैकी 8 षटकार हे थेट मैदानाबाहेर गेले.

बार्बाडोसच्या मैदानात गेलने अक्षरशः षटकारांचा पाऊस पाडला. प्रत्येक वेळा चेंडू मैदानाबाहेर गेल्यानंतर पंचांना नवीन चेंडू आणण्यासाठी सामना थांबवाला लागला. त्याच्या या कामगिरीचं नेटीझन्सनीही तोंडभरुन कौतुक केलं.

दरम्यान पहिल्या सामन्यात गेलने शाहीद आफ्रिदीचा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाचा विक्रम आपल्या नावे जमा केला. याचसोबत गेलने इंग्लंडविरोधात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकारांचं शतकही पूर्ण केलं. मात्र त्याची ही खेळी विंडीजला विजय मिळवून देऊ शकली नाही.