News Flash

वेटेल अजिंक्य

भन्नाट वेगासह जगभरातल्या फॉम्र्युला-वन शर्यतींवर अधिराज्य गाजवणाऱ्या जर्मनीच्या सेबॅस्टियन वेटेलने पहिल्यांदाच घरच्या मैदानावर ग्रां. प्रि. शर्यत जिंकण्याची किमया साधली. आतापर्यंत जुलै महिन्यात ग्रां. प्रि. शर्यत

| July 8, 2013 06:07 am

भन्नाट वेगासह जगभरातल्या फॉम्र्युला-वन शर्यतींवर अधिराज्य गाजवणाऱ्या जर्मनीच्या सेबॅस्टियन वेटेलने पहिल्यांदाच घरच्या मैदानावर ग्रां. प्रि. शर्यत जिंकण्याची किमया साधली. आतापर्यंत जुलै महिन्यात ग्रां. प्रि. शर्यत जिंकू न शकणाऱ्या २६ वर्षीय वेटेलने किमी राइकेइन आणि त्याचा सहकारी रोमेन ग्रोसजनवर निसटत्या फरकाने मात करत अव्वल स्थान पटकावले.
यंदाच्या वर्षांतला हा वेटेलचा चौथा विजय तर कारकीर्दीतील ३०वा विजय ठरला. या विजयासह ड्रायव्हर्स चॅम्पियनशिपमध्ये वेटेलने महत्त्वपूर्ण ३६ गुणांची कमाई केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2013 6:07 am

Web Title: unbeatable vettel
टॅग : Speed
Next Stories
1 ब्रायन बंधूंचे विक्रमी जेतेपद
2 पिंकी सोनकरच्या हस्ते विम्बल्डनची नाणेफेक
3 टॅटू हे माझे यशाचे गमक -विनाथो
Just Now!
X