भारत आणि पाकिस्तान या कट्ट्रर प्रतिस्पर्ध्यांविरोधात होणाऱ्या सामन्यावर अवघ्या जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. दोन्ही देशांच्या क्रीडाप्रेमींसाठी हा सामना म्हणजे एखाद्या युद्धापेक्षा कमी नाहीये. दरम्यान, पाकिस्तान संघाचा कर्णधार सरफराज अहमद याचे मामा महबूब हसन यांची प्रतिक्रिया आली आहे. महबूब हसन हे उत्तर प्रदेशच्या इटावा येथील रहिवासी आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना महबूब हसन यांनी भारत-पाक सामन्याबाबत भाष्य केलं आणि भारताच्या विजयाची इच्छ व्यक्त केली. यासोबतच त्यांनी पाकिस्तानचा कर्णधार आणि त्यांचा भाचा सरफराज अहमद यानेही चांगली कामगिरी करावी, जेणेकरुन तो कर्णधारपदी कायम रहावा असं म्हटलं आहे. ‘भारतीय संघातील सर्व खेळाडू चांगला खेळ करत असून हा शानदार संघ आहे. भारतीय संघ या सामन्यात विजयी व्हावा अशीच माझी इच्छा आहे. पण त्यासोबतच चांगली कामगिरी करण्यासाठी माझा भाचा सरफराज अहमद यालाही माझ्या शुभेच्छा आहेत कारण त्याने चांगली कामगिरी केली तर पाकिस्तानी संघाचं कर्णधारपद त्याच्याकडे शाबूत राहिल’, असं महमूद म्हणाले.

Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Rishabh becomes first player to play 100th match for Delhi
IPL 2024 : ऋषभ पंतने झळकावले अनोखे ‘शतक’, दिल्ली कॅपिटल्ससाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू


सरफराज अहमदचे मामा महमूद हसन 1995 पासून इटावाच्या बाबासाहेब भीमराव आंबेडकर कृषीइंजिनिअरिंग महाविद्यालयात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहेत.