07 June 2020

News Flash

न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतून हार्दिक पांड्या संघाबाहेर

BCCI ची पत्रकाद्वारे माहिती

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या, न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. कसोटी मालिकेच्या संघ निवडीआधी हार्दिक पांड्या फिटनेस टेस्टमध्ये नापास झाल्यामुळे तो कसोटी मालिकेसाठी उपलब्ध नसेल असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. काही महिन्यांपूर्वी लंडनमध्ये हार्दिक पांड्याच्या पाठीवर शस्त्रक्रीया करण्यात आलेली होती. यानंतर बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याच्यावर बीसीसीआयचे डॉक्टर आणि फिजीओ यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु होते.

“न्यूझीलंडविरुद्ध आगामी कसोटी मालिकेत हार्दिक पांड्या खेळू शकणार नाही. त्याच्या पाठीच्या दुखापतीवर पुढील उपचार घेण्यासाठी तो लंडनला जाणार आहे.” BCCI चे सचिव जय शहा यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. आशिया चषकादरम्यान हार्दिक पांड्याच्या पाठीला दुखापत झाली होती. यानंतर हार्दिकने भारतीय संघाकडून काही महत्वाच्या मालिकाही खेळल्या. मात्र २०१९ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावरील मालिकेत खेळत असताना हार्दिकची दुखापत पुन्हा एकदा बळावली गेली. ज्यानंतर हार्दिक संघाबाहेर गेला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 1, 2020 3:39 pm

Web Title: unfit hardik pandya ruled out of test series against new zealand ppsd 91
Next Stories
1 Ind vs NZ : थरारक सामन्यात बाजी मारुनही भारतीय संघाला दंड, जाणून घ्या कारण…
2 मोहम्मद शमी सध्याच्या घडीला जगातला सर्वोत्तम गोलंदाज – शोएब अख्तर
3 व्हाईटवॉशच्या उद्देशाने आम्ही मैदानात उतरु – मनिष पांडे
Just Now!
X