डेन्वर : ख्रिस्तियन पुलिसिचने अतिरिक्त वेळेत नोंदवलेल्या निर्णायक गोलच्या बळावर अमेरिकेने मेक्सिकोवर ३-२ अशी सरशी साधून नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद मिळवले.

अंतिम सामन्यात मॅम्युएल करोना (पहिले मिनिट) आणि दिएगो लेन्झ (७९ मि.) यांनी मेक्सिकोसाठी गोल केले. मात्र रेयान (२७ मि.) आणि वेस्टॉन मॅकेनी (८२ मि.) यांनी अमेरिकासाठी गोल नोंदवल्यामुळे सामना अतिरिक्त वेळेपर्यंत लांबला. अखेर ११४व्या मिनिटाला कालरेस साल्चेडोने पुलिसिचला पेनल्टी क्षेत्रात पाडल्यामुळे अमेरिकेला पेनल्टी बहाल करण्यात आली आणि पुलिसिचनेच तिसरा गोल झळकावला. सहा मिनिटांनी मार्क मॅकेन्झीच्या हाताला चेंडू लागल्यामुळे मेक्सिकोलाही पेनल्टी मिळाली, परंतु कर्णधार आंद्रेस गॉर्डाडोने टोलवलेला चेंडू गोलरक्षक एथान हॉवर्टने अडवल्यामुळे अमेरिकेचा विजय निश्चित झाला.

नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धा