27 February 2021

News Flash

Universal Boss! ख्रिस गेलने ठोकले ५०० षटकार

एकदिवसीय क्रिकेटमध्ये गाठला १० हजार धावांचा टप्पा

विंडीजविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने २९ धावांनी विजय मिळवला आणि ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ४१८ धावा ठोकल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजला मात्र ३८९ धावांपर्यंतच मजल मारता आली. पण या सामन्यात झंझावाती खेळी करत ख्रिस गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५०० षटकारांचा टप्पा पार केला.

४१९ धावांचा पाठलाग करताना गेलने तुफान खेळी केली. त्याने ९७ चेंडूत १६२ धावा तडकावल्या. या खेळीत त्याने तब्बल १४ षटकार लगावले आणि ११ चौकाराची जोड दिली. या १४ षटकाराच्या मदतीने त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ५०० षटकारांचा टप्पादेखील गाठला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० षटकार फटकावणारा पहिला क्रिकेटपटू ठरला. याबरोबरच एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३०० हून षटकार लगावणारादेखील तो पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीनंतर दुसरा क्रिकेटपटू ठरला. तसेच त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पादेखील गाठला.

दरम्यान, इंग्लंडकडून सर्वाधिक १५० धावांची खेळी करणाऱ्या जोस बटलर याला सामनावीर जाहीर करण्यात आले. त्याने ७७ चेंडूत १३ चौकार आणि १२ षटकारांच्या मदतीने ही खेळी साकारली होती. त्याला कर्णधार मॉर्गन (१०३) आणि हेल्स (८२) याने उत्तम साथ केली. तर विंडीजकडून डॅरेन ब्राव्हो (६१) आणि कार्लोस ब्रेथवेट (५०) यांनी गेलला चांगली साथ केली. पण तरीदेखील त्यांचे प्रयत्न २९ धावांनी तोकडे पडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2019 9:21 am

Web Title: universal boss windies batsman chris gayle became the first player to hit 500 sixes in international cricket
Next Stories
1 IND vs AUS : …म्हणून आम्ही मालिका गमावली; विराटचे स्पष्टीकरण
2 World Cup 2019 : …तर टीम इंडियाच्या सुरक्षेत वाढ करू! – ICC
3 भारतीय महिलांचा निर्भेळ यशाचा निर्धार!
Just Now!
X