News Flash

भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय द्रविडला दिलं जात असतानाच, द्रविड म्हणतो…

द्रविडने पहिल्यांदाच यासंदर्भात भाष्य केलं आहे

ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये बॉर्डर-गावस्कर चषकावर २-१ च्या फरकाने आपलं नाव कोरणाऱ्या भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतीय संघातील अनेक आघाडीचे खेळाडू संघात नसतानाही भारताने हा ऐतिहासिक विजय मिळवला. शुभमन गिल, ऋषभ पंत, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदरासरख्या तरुण खेळाडूंनी या विजयामध्ये महत्वाची भूमिका बजावली. या विजयानंतर भारतीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव झाला. सोशल नेटवर्किंगवर तर Rahul Dravid हा ट्रेण्ड दिसून येत आहेत. द्रविडनेच अनेक तरुण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटसाठी तयार केल्याचं सांगत द्रविड या विजयाचा खरा मानकरी असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. मात्र या विजयाचे श्रेय द्रविडला दिलं जात असतानाच त्याने स्वत: पहिल्यांदाच या प्रकरणावर आपलं मत नोंदवलं आहे.

नक्की वाचा >> Ind vs Aus: …म्हणून भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर क्रिकेट चाहते मानतायत द्रविडचे आभार

नेहमीप्रमाणे द्रविडने आपल्या खास शैलीमध्ये हाय विजयासाठी आपण जबाबदार नसल्याने सांगत ऑस्ट्रेलियातील यशासाठी कारण नसताना मला श्रेय दिलं जात आहे, असं मत द्रविडने व्यक्त केलं आहे. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना द्रविडला ऑस्ट्रेलियातील विजयासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्याने हसत या विजयाचं श्रेय घेण्यास नकार दिला. “हे श्रेय उगाच मला दिलं जात आहे. सर्व तरुण खेळाडूंनी कौतुकास्पद खेळ केला आहे,” असं द्रविड म्हणाला. द्रविडने श्रेय नाकारलं असलं तरी ऋषभ पंत, हनुमा विहारी, शुभमन गिलसारख्या अनेक खेळाडूंनी आमच्या यशामध्ये द्रविडचा हात आहे असं अनेकदा म्हटलं आहे.

नक्की वाचा >> सिडनी कसोटीनंतर राहुल सरांनी मला मेसेज केला होता, म्हणाले…; हनुमा विहारीचा खुलासा

निवड समितीचे माजी सदस्य असणाऱ्या जतिन परांजपे यांनीही इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सध्याच्या भारतीय संघाला मिळालेल्या यशामध्ये द्रविडचा मोठा वाटा असल्याचं म्हटलं आहे. “द्रविडने सर्वच तरुण खेळाडूंना काही महत्वाचे सल्ले दिले होते. याचमुळे त्यांच्या खेळाचा दर्जा वाढला. द्रविडनेच या खेळाडूंच्या खेळाचा पाया मजबूत करण्याला प्राधान्य दिलं. त्यानंतर हे सर्व खेळाडू रवि शास्त्रींच्या तालमीत शिकले. याचा या तरुण खेळाडूंना भरपूर फायदा झाला,” असं परांजपे सांगतात.

“भारतीय संघाच्या दौऱ्याआधी भारतीय संघाचा स्पोर्टींग स्टाफ, भारत अ आणि १९ वर्षांखालील संघ, निवड समिती सदस्यांसोबत राहुल द्रविड चर्चा करतो आणि कोणत्या खेळाडूंकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे यासंदर्भातील सल्लेही देतो. भारतीय अ संघामध्ये कोणाचीही निवड करताना तो रणजीमध्ये कसा खेळला हे पाहिलं जातं. मयंक अग्रवाल आणि हनुमा विहारी यांना याच पद्धतीने भारतीय संघात स्थान मिळालं. भारतीय अ संघाकडे द्रविडसारखा प्रशिक्षक असेल तर त्याचा संघाला नक्कीच फायदा होईल,” असं मतही परांजपे यांनी व्यक्त केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 8:32 am

Web Title: unnecessary credit boys deserve all praise rahul dravid reacts after being credited for team india success scsg 91
Next Stories
1 मेलबर्नच्या शतकाने विजयाची पायाभरणी!
2 विजय हजारे क्रिकेट स्पर्धा : मुंबईच्या संघनिवडीसाठी अंकोला यांचे साकडे
3 कसोटी सलामीवीर झाल्यास स्वप्नपूर्ती!
Just Now!
X