News Flash

सचिन तेंडुलकरच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण

सचिन तेंडुलकर म्हणजे समस्त क्रिकेटविश्वाचे दैवत. दूरवर पसरलेल्या सिडनीतही सचिन महतीचा प्रत्यय आला. उत्साही आणि जल्लोषपूर्ण वातावरणात सचिन तेंडुलकरच्या मेणाच्या पुतळ्याचे सिडनी क्रिकेट मैदानात अनावरण

| April 21, 2013 02:18 am

सचिन तेंडुलकर म्हणजे समस्त क्रिकेटविश्वाचे दैवत. दूरवर पसरलेल्या सिडनीतही सचिन महतीचा प्रत्यय आला. उत्साही आणि जल्लोषपूर्ण वातावरणात सचिन तेंडुलकरच्या मेणाच्या पुतळ्याचे सिडनी क्रिकेट मैदानात अनावरण झाले. या मैदानावर सचिनने काही संस्मरणीय खेळी साकारल्या आहेत. २४ एप्रिलला सचिन चाळिशीत पदार्पण करणार आहे, त्या पाश्र्वभूमीवर सचिनच्या चाहत्यांनी अनावरणप्रसंगी उपस्थित राहात त्याचा वाढदिवस साजरा केला. भारतीय एकदिवसीय संघाच्या जर्सीत बॅटसह दोन्ही हात उंचावणारा सचिन साकारण्यात आला आहे.
लंडनच्या मादाम तुसाँ संग्रहालयात सचिनच्या पुतळ्याची प्रतिकृती असलेला हा पुतळा डोनॉल्ड ब्रॅडमन आणि शेन वॉर्न यांच्यासह सिडनीच्या हार्बर संग्रहालयात असणार आहे.
विशेष म्हणजे, सचिनने विख्यात फिरकीपटू शेन वॉर्न याच्यासह डॉन ब्रॅडमन यांची भेट घेतली होती. या तीन विश्वविख्यात क्रिकेटपटूंचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते आणि आता या तिघांचे पुतळे एकसाथ त्यांच्या चाहत्यांना बघायला मिळणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2013 2:18 am

Web Title: unveil of wax statue of sachin tendulkar
टॅग : Sports
Next Stories
1 बुद्धिबळातले सम्राट!
2 अभिलाषच्या ‘साहसगाथे’ची सोनेरी पाने..
3 महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू
Just Now!
X