23 November 2017

News Flash

आता धोनीला खुणावतोय हा विक्रम

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत हा विक्रम होणार का?

ऑनलाइन टीम | Updated: September 14, 2017 2:06 PM

महेंद्रसिंह धोनी

क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टम्पिंग करण्याचा विक्रम केल्यानंतर आता भारतीय संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी याला आणखी एक विक्रम खुणावतोय. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला या विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे. श्रीलंका दौऱ्यावर वनडे सामन्यात सर्वाधिक यष्टिचित करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित करणारा भारताचा चपळ यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीला आणखी एक विक्रम खुणावत आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तो या विक्रमाला गवसणी घालतो का? हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०१ एकदिवसीय सामन्यात धोनीने आतापर्यंत ५२.२० च्या सरासरीने ९६५८ धावा केल्या आहेत. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याला दहा हजार धावांचा टप्पा गाठण्याची संधी आहे. या मालिकेत धोनीने ३४२ धावा केल्यास तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड यांच्या पंक्तीत विराजमान होईल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या सचिन तेंडुलकरने ४६३ वनडे सामन्यात १८४२६ धावा केल्या आहेत. सचिन पाठोपाठ श्रीलंकेचा कुमार संगकारा ४०४ सामन्यात १४२२३ धावा करुन दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग १३ हजार ७०४ (३७३), सनथ जयसूर्या १३ हजार ४३० (४४५), महिला जयवर्धने १२ हजार ६५० (४४८), इंझमाम उल हक ११ हजार ७३९ (३७८), जॅक कॅलिस ११ हजार ५७९ (३२८), सौरव गांगुली १० हजार ८८९ (३४४), राहुल द्रविड १० हजार ८८९ (३४४) ब्रायन लारा १० हजार ४०५ (२९९) आणि तिलकरत्ने दिलशान १० हजार २९० (३३०) या दिग्गजांनी वनडेत दहा हजार धावांचा टप्पा गाठला आहे.

भारतीय संघाचे नेतृत्व करताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा धोनीच्या नावावर आहे. एवढेच नाही तर कर्णधार असताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळी करणारा धोनी हा एकमेव भारतीय कर्णधार आहे. धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४० सामन्यांत भारताचे नेतृत्व केले आहे. या सामन्यांमध्ये दोन शतकांच्या मदतीने त्याने १२०४ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धची त्याची ही कामगिरी आणि सध्याचा त्याता फॉर्म पाहता आगामी मालिकेत दहा हजार धावांचा टप्पा गाठणे धोनीला अवघड नाही.

First Published on September 14, 2017 2:06 pm

Web Title: upcoming australia series mahendra singh dhoni chance to make 10 thousand runs in odi