25 February 2021

News Flash

Us Open 2018 : सेरेना विल्यम्सवर मात करणारी नाओमी ओसाका आहे तरी कोण? जाणून घ्या…..

नाओमीची सेरेनावर दोन सेट्समध्ये मात

आपलं पहिलं ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवणारी नाओमी ओसाका

जपानची २० वर्षीय युवा खेळाडू नाओमी ओसाकाने, अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सवर मात करुन अमेरिकन ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. ओसाकाचं हे पहिलं ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरलं आहे. ६-२, ६-४ च्या फरकाने सामना जिंकत ओसाकाने विल्यम्सला विश्वविक्रमी कामगिरीशी बरोबरी करण्यापासून रोखलंय. अशी कामगिरी करणारी ती पहिली जपानी खेळाडू ठरली आहे.

या विजयानंतर सोशल मीडियावर सर्वच ठिकाणी नाओमी ओसाकाची चर्चा सुरु आहे. त्यामुळे सेरेनासारख्या दिग्गज खेळाडूवर मात करणारी नाओमी आहे तरी कोण हे आज आपण जाणून घेणार आहोत.

अवश्य वाचा – US Open 2018 Womens Final : जपानची नाओमी ओसाका ठरली विजेती, सेरेनाचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं

 • १६ ऑक्टोबर १९९७ साली नाओमी ओसाकाचा जन्म झाला.
 • १९९९ साली सेरेना विल्यम्सने आपलं पहिलं अमेरिकन ओपनचं विजेतेपद मिळवलं, यावेळी नाओमी ही अंदाजे एक ते दीड वर्षाची होती.
 • ग्रँडस्लॅम स्पर्धेचं विजेतेपद मिळवणारी नाओमी पहिली जपानी खेळाडू ठरली आहे. तर आशिया खंडातून ग्रँडस्लॅम स्पर्धेचं विजेतेपद मिळवणारी दुसरी खेळाडू ठरली आहे. याआधी चीनच्या ली ना या खेळाडूने अशी कामगिरी करुन दाखवली आहे.
 • लहानपणापासूनच सेरेना विल्यम्स ही ओसाकाची सर्वात आवडती खेळाडू होती.
 • वयाच्या तिसऱ्या वर्षी नाओमी अमेरिकेला आली, २०१३ सालात नाओमीने प्रोफेशनल टेनिसमध्ये प्रवेश केला. सेरेना विल्यम्सचे एकेकाळचे प्रशिक्षक साशा बाजिन यांच्याकडे नाओमी फ्लोरिडा येथे प्रशिक्षण घेते आहे.
 • २०१४ साली अॉकलंड WTA स्पर्धेत नाओमीने पहिल्यांदा आपल्या कामगिरीने सर्वांना दखल घेण्यास भाग पाडलं.
 • २०१६ सालची ऑस्ट्रेलियन ओपन ही नाओमीची पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा ठरलेली आहे.
 • एप्रिल २०१६ मध्ये नाओमीने पहिल्यांदा जागतिक क्रमवारीत पहिल्या १०० जणांमध्ये स्थान मिळवलं. पुढील वर्षभरातच नाओनमीने आपल्या खेळात सुधारणा करत पहिल्या ५० खेळाडूंच्या यादीत प्रवेश केला.
 • मार्च २०१८ मध्ये नाओमीने आपलं पहिलं WTA स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. या स्पर्धेत नाओमीने मारिया शारापोव्हा, कॅरोलिना पिलीस्कोव्हा आणि सिमोना हेलप यांच्यासारख्या मातब्बर खेळाडूंना धक्का दिला.
 • यानंतर मार्च महिन्यात मियामी येथे झालेल्या एका स्पर्धेत नाओमीने सेरेना विल्यम्सला हरवलं होतं.
 • १७ जुलै २०१८ रोजी नाओमीने आपल्या कारकिर्दीतलं सर्वोत्तम स्थान पटकावलं. या कालावधीत ती १७ व्या स्थानावर आली. सध्या ती १९ व्या स्थानावर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2018 8:37 am

Web Title: us open 2018 who is naomi osaka the new us open champion
Next Stories
1 US Open 2018 Womens Final : जपानची नाओमी ओसाका ठरली विजेती, सेरेनाचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं
2 इशारा.. तुला कळला ना!
3 ऑलिम्पिक यशाची नांदी !
Just Now!
X