ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिमने अलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पहिले ग्रँडस्लॅम पदक मिळवले आहे. पहिल्या दोन सेटमध्ये पराभव झाल्यानंतर थिमने जोरदार पुनरागमन करत शेवटचे तीनही सेट जिंकले. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या थिमने अलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव केला. ४ तास २ मिनिटे सुरु असलेल्या या सामन्यात सहा वर्षात पहिल्यांदाच युएस ओपन स्पर्धेला नवा विजेता मिळला आहे.

अलेक्झांडर थिमविरुद्धच्या सलामीच्या पहिल्या दोन सेटमध्ये २-६, ४-६ अशी आघाडी घेतली होती, पण नंतर थीमने दमदार पुनरागमन करत ६-४, ६-३, ७-६ अशा फरकाने बाकीचे सेट जिंकले. तिसऱ्या सेटमध्ये क्लॅनने दमदार पुनरागमन केले आणि ३-६ असा सेट जिंकला.

राफेल नदाल आणि रॉजर फेडरर या दिग्गजांनी स्पर्धेतून माघार घेतल्याने नोव्हाक जोकोव्हिच युएस ओपन स्पर्धेतील ग्रँडस्लॅमसाठी प्रबळ दावेदार मानला जात होता. पण जोकोव्हिचच्या अनपेक्षित हकालपट्टीमुळे अमेरिकन ओपन स्पर्धेतला सहा वर्षानंतर नविन विजेता मिळणार हे निश्चित झाले होते.

अमेरिकन ओपनच्या इतिहासात पहिल्यांदाच पहिल्या दोन सेट मध्ये पराभव होवून सुद्धा सामना जिंकणारा डॉमिनिक थिम पहिलाच खेळाडू ठरला आहे. डॉमिनिक थिमने पहिल्यादांच ग्रँडस्लॅमचे विजेते पद मिळवले आहे. याआधी तीन वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यात त्याचा पराभव झाला होता.