News Flash

US Open : भारताच्या सुमित नागलने फेडररला झुंजवले

नेटकऱ्यांची मिळवली वाहवा

भारताच्या सुमित नागल याने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत दमदार खेळ करून स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर याला विजयासाठी चांगलेच झुंजवले. सुमितने त्याच्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेला स्वप्नवत सुरूवात केली होती. त्याने पहिल्याच सेटमध्ये टेनिसचा राजा असलेल्या फेडररला ६-४ असे पराभूत केले होते. पण त्यानंतर फेडररने आपला अनुभव पणाला लावत सामना ४-६, ६-१, ६-२, ६-४ असा जिंकला. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या रॉजर फेडररने सुमितविरूद्धचा सामना जिंकला खरा पण या सामन्यात सुमितच्या लढाऊवृत्तीचे तोंडभरून कौतुक करण्यात आले.

सुमित नागल हा पहिल्यांदाच रॉजर फेडररसमोर टेनिस कोर्टमध्ये उभा ठाकला होता. इतक्या बलाढ्य खेळाडू विरोधात अमेरिकन ओपनसारख्या ग्रँडस्लॅम स्पर्धेचा सलामीची सामना खेळणे हे मोठी गोष्ट होती. पण सुमित जरासाही न घाबरता या आव्हानाला सामोरा गेला. ईतकेच नव्हे तर त्याने सलामीच्या सेटमध्ये फेडररला ६-४ अशी धूळही चारली.

त्याने पहिला सेट जिंकल्यानंतर साऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. फेडररसारख्या खेळाडूसोबत पहिल्याच सामन्यात पहिला सेट जिंकणे हे खूप मोठी बाब होती. त्यामुळे तो साऱ्यांच्याच चर्चेचा विषय बनला. पण फेडररने त्यानंतर आपला दमदार खेळ दाखवून दिला. त्याने दुसरा सेट ६-१ असा जिंकत जोरदार पुनरागमन केले. त्या सेटमध्ये सुमितला फारसा प्रतिकार करता आला नाही. तिसऱ्या सेटमध्येही फेडररने आपला जलवा दाखवत ६-२ असा सेट खि्शात घातला आणि सामन्यात आघाडी घेतली. पण चौथ्या सेटमध्ये मात्र सुमितने फेडररला पुन्हा निकराची झुंज दिली. फेडरर सहज विजय मिळवेल असे वाटत असताना सुमितने फेडररला चांगलेच झुंजवले. पण अखेर भारताच्या सुमितला पराभवाचा सामना करावा लागला.

सुमितचा पराभव झाला असला तरी फेडररसारख्या बलाढ्य टेनिसपटूला विजयासाठी झुंजवल्याबद्दल नेटकऱ्यांनी सुमितची वाहवा केली अन् सुमितने चाहत्यांची मनं जिंकली.

पात्रता फेरीतील ३ सामने जिंकल्यानंतर सुमितला मुख्य स्पर्धेत स्थान मिळाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 10:16 am

Web Title: us open india tennis player sumit nagal tough fight roger federer vjb 91
Next Stories
1 विकासच्या चढायांपुढे बंगालचे प्रयत्न अपुरे
2 घाटे गटाशी युती आणि दादर-प्रभादेवीची मते जाधव गटासाठी निर्णायक
3 अविश्वसनीय!
Just Now!
X