तब्बल पाच तास रंगलेल्या सामन्यात रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा पराभव करत स्पेनच्या राफेल नदालने यूएस ओपनच्या पुरूष एकेरी मुकुटावर आपले नाव कोरले. नदालने मेदवेदेवचा ७-५,६-३,५-७, ४-६, ६-४ असा पराभव केला. नदालचे हे १९ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. नदालने इटलीच्या माटियो बेरेटिनीचा पराभव करत यूएस ओपनच्या अंतिम फेरीत धडक दिली होती.

यूएस ओपनच्या पुरूष एकेरीच्या उपांत्य फेरीत राफेल नदालने इटलीच्या मॅट्टेओ बेरेट्टिनीचा सरळ सेटमध्ये पाडाव केला होता. नदालने बेरेट्टिनीला ७-६ (८-६), ६-४, ६-१ असे नमवून अंतिम फेरी गाठली होती. तर पाचव्या मानांकित रशियाच्या डॅनिल मेदवेदेवने दिमित्रोववर ७-६, (७-५), ६-४, ६-३ अशी मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. पहिल्याच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणारा डॅनिल मेदवेदेव हा २००५ नंतरचा रशियाचा पहिला पुरुष टेनिसपटू आहे. याआधी मराट सॅफिनने ऑस्ट्रेलियन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.

पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात राफेल नदाल आणि डॅनिल मेदवेदेवचा यांच्यातील लढतीचा थरार पाच तास चालला. तब्बल पाच फेऱ्यानंतर नदालने मेदवेदेवचा ७-५,६-३, ५-७, ४-६, ६-४ असा पराभव केला. नदालने २७व्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर आतापर्यंत १८ ग्रँडस्लॅम जिंकल्या आहेत. हे नदालचे १९वे ग्रँडस्लॅम आहे. यापूर्वी नदालने २०१०, २०१३ आणि २०१७ मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली आहे..