News Flash

US Open : अटीतटीच्या लढतीत नदाल विजयी, उपांत्य फेरीत प्रवेश

४ तासांहून अधिक काळ थिमने नदालला झुंजवले

राफेल नदाल

US Open : ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थीमशी झालेल्या अटीतटीच्या लढतीत स्टार टेनिसपटू राफेल नदाल याने विजय मिळवत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. त्याने थीमला ०-६, ६-४, ७-५, ६-७(४-७), ७-६(७-५) असे पराभूत केले.

सामना सुरु होण्याआधी हा सामना रंगतदार होईल अशी अपेक्षा चाहत्यांना नव्हती. मात्र थीमने पहिला सेट ६-० असा जिंकून सामना एकतर्फी होतो की काय असे भासवून दिले. दुसऱ्या सेटमध्ये नदालने पुनरागमन केले आणि ६-४ असा तो सेट जिंकला. त्या पाठोपाठ त्याने ७-५ असा तिसरा सेट जिंकला. आता चौथा सेटही नदाल जिंकणार आणि सामन्यात विजय पटकावणार अशी चाहत्यांची धारणा झाली होती. पण त्यावेळी थिमने पुन्हा जोरदार पुनरागमन केले. चौथा सेट टायब्रेकरपर्यंत गेला आणि थीमने तो सेट जिंकला.

अखेर चार तासाहून अधिक काळ चाललेला सामना पाचव्या सेटपर्यंत पोहोचला. पाचवा सेटदेखील टायब्रेकरमध्ये पोहोचला. मात्र यावेळी नदालने विम्बल्डन मधील चूक न करता स्वतःला शांत ठेवले आणि मोकाच्या क्षणी दोन गुणांची आघाडी मिळवून सामना जिंकला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2018 11:45 am

Web Title: us open rafael nadal into semi final after tough match with dominic thiem
टॅग : Rafael Nadal,Us Open
Next Stories
1 US Open : सेरेनाची उपांत्य फेरीत धडक, गतविजेत्या स्टीफन्सला धक्का
2 अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : शारापोव्हाला पराभवाचा धक्का
3 भारतीय ‘अ’ संघाला विजयासाठी १९९ धावांची गरज
Just Now!
X