News Flash

सानिया मिर्झा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत सानिया आणि ब्रुनो सोरेस यांनी वाय. जे चॅन

| September 4, 2014 11:33 am

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत सानिया आणि ब्रुनो सोरेस यांनी वाय. जे चॅन आणि रॉस हटचीन्स या जोडीचा ७-५, ४-६, १०-७ असा पराभव केला. यानिमित्ताने तिसऱ्यांदा ग्रँडस्लँम स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याची संधी सानिया मिर्झासमोर आहे.  मिश्र दुहेरीप्रमाणे महिला दुहेरी या प्रकारातदेखील सानियाने झिम्बाब्वेच्या कॅरा ब्लॅकच्या साथीने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. मिश्र दुहेरीत अग्रमानांकन असलेले सानिया आणि ब्रुनो हे पहिल्या सेटमध्ये ५-० असे पिछाडीवर असताना ५-५ अशी बरोबरी करत पहिला सेट टायब्रेकरमध्ये जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये त्यांना ४-६ असा पराभव स्वीकारावा लागला. पण, तिसऱ्या सेटमध्ये सानिया व ब्रुनो यांनी जोरदार खेळ करत हा सेट १०-७ असा जिंकून सामन्यावर वर्चस्व मिळविले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 11:33 am

Web Title: us open sania mirza in mixed doubles final
टॅग : Sania Mirza,Tennis,Us Open
Next Stories
1 फेडररची आगेकूच
2 आयएसएलमध्ये ब्राझीलचे झिको!
3 रितू राणीकडे भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व
Just Now!
X