News Flash

US Open : सेरेनाची उपांत्य फेरीत धडक, गतविजेत्या स्टीफन्सला धक्का

कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिला ६-४, ६-३ अशा सरळ सेटमध्ये केले पराभूत

सेरेना विल्यम्स

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत १७वे मानांकन असलेल्या स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व सेरेनाने कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिला ६-४, ६-३ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले.

सेरेनाने संपूर्ण सामन्यावर पूर्ण वर्चस्व राखले. पहिल्या सेटमध्ये सेरेनाला थोडेसे झुंजावे लागले. पण २ गेमच्या फरकाने सेरेनाने सेट जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये मात्र सेरेनाला प्लिस्कोव्हाकडून कडवी टक्कर मिळेल, अशी अपेक्षा होती. पण तो सेट तर सेरेनाने अत्यंत सहजतेने जिंकला. या सामन्यात सेरेनाने १३ एसेस मिळवले. तर तुलनेत प्लिस्कोव्हाला केवळ ३ एसेस मिळवता आले. याच मुद्द्यावर सामना सेरेनाचा बाजूने फिरला. कारण पहिल्या आणि दुसऱ्या सर्व्हवर गुण कमावण्याची टक्केवारी दोनही खेळाडूंची समानच होती.

याव्यतिरिक्त, गतविजेती स्लोआन स्टीफन्स हिला पराभवाचा सामना करावा लागला. १९व्या मानांकित सेवास्तोव्हा हिने तिचा ६-२, ६-३ असा सहज पराभव केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2018 11:28 am

Web Title: us open serena williams into semi finals sloane stephens stephens out
टॅग : Serena Williams,Us Open
Next Stories
1 अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : शारापोव्हाला पराभवाचा धक्का
2 भारतीय ‘अ’ संघाला विजयासाठी १९९ धावांची गरज
3 ओमप्रकाशचा सुवर्णवेध!
Just Now!
X