News Flash

US Open: वॉवरिंका अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीत दाखल

दुसरीकडे गतविजेता नोव्हाक जोकोव्हिच देखील स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे.

ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच ओपन स्पर्धेचा मानकरी वॉवरिंकाची उपांत्य फेरीत सहाव्या मानांकित जपानच्या केई निशिकोरी याच्याशी लढत होणार आहे.

स्टॅनिसलस वॉवरिंकाने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. वॉवरिंकाने २००९ सालच्या विजेत्या मार्टिन डेल पोट्रो याचा ७-६(५), ४-६, ६-३, ६-२ अशा सेटमध्ये पराभव केला. डेल पोट्रोने सामन्यात चांगली झुंज दिली. मनगटाच्या दुखापतीमुळे गेल्या ९ स्पर्धांमध्ये पोट्रोला खेळता आले नव्हते.

वाचा: जोकोव्हिच जेतेपदापासून दोन पावले दूर

ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच ओपन स्पर्धेचा मानकरी वॉवरिंकाची उपांत्य फेरीत सहाव्या मानांकित जपानच्या केई निशिकोरी याच्याशी लढत होणार आहे. दुसरीकडे गतविजेता नोव्हाक जोकोव्हिच देखील स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दुखापतीमुळे जोकोव्हिचचा प्रतिस्पर्धी जो-विलफ्रेड त्सोंगाला सामना अध्र्यावर सोडावा लागला. या सामन्यात जोकोव्हिच ६-३, ६-२ असा आघाडीवर असताना त्सोंगाची दुखापत बळावली आणि त्याने माघार घेतली. गेल्या पाच सामन्यांमध्ये तिसऱ्यांदा प्रतिस्पध्र्याच्या दुखापतीमुळे जोकोव्हिचला पुढे चाल मिळू शकली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 1:09 pm

Web Title: us open stan wawrinka beats juan martin del potro in four set marathon
Next Stories
1 जोकोव्हिच जेतेपदापासून दोन पावले दूर
2 नेयमारमुळे ब्राझील विजयी
3 क्रीडासंस्कृती अभावी ऑलिम्पिकमध्ये पीछेहाट – मेरी कोम
Just Now!
X