21 September 2020

News Flash

उसेन बोल्ट २०० मीटरचाही चॅम्पियन

जमैकाचा विश्वविक्रमवीर धावपटू उसेन बोल्टने बीजिंगमध्ये सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत १०० मीटर पाठोपाठ २०० मीटरचेही जेतेपद पटकावले आहे.

| August 27, 2015 07:08 am

Usain Bolt

जमैकाचा विश्वविक्रमवीर धावपटू उसेन बोल्टने बीजिंगमध्ये सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत १०० मीटर पाठोपाठ २०० मीटरचेही जेतेपद पटकावले आहे. बोल्टने २०० मीटरची शर्यत १९.५५ सेकंदात पूर्णकरून आपणच जगातील सर्वात वेगवान व्यक्ती असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. तर, अमेरिकेच्या जस्टीन गॅटलीनला याही स्पर्धेत दुसऱया स्थानावर समाधान मानावे लागले. गॅटलीनने १९.७४ सेकंदात शर्यत पूर्ण करून बोल्टला कडवी टक्कर दिली.
वेगाचा अनभिषिक्त सम्राट
दरम्यान, या स्पर्धेच्या १०० मीटर श्रेणीत उसेन बोल्ट आणि गॅटलीनमध्ये रविवारी अतितटीची झुंझ पाहायला मिळाली होती. बोल्टने ९.७९ सेकंदात शर्यत पूर्ण करून स्पर्धेचे जेतेपद कायम राखले होते, तर गॅटलीनने ९.७९ सेकंदात शर्यत पूर्ण करून रौप्य पदकाची कमाई केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2015 7:08 am

Web Title: usain bolt claims 200m gold in 19 55 secs at world athletics championships justin gatlin second
टॅग Usain Bolt
Next Stories
1 डिव्हिलियर्सने मोडला सचिन, सौरवचा विक्रम
2 खेलरत्न पुरस्कार : सानिया, क्रीडा मंत्रालयाला उच्च न्यायालयाची नोटीस
3 जागतिक मैदानी स्पर्धा : टिंटू लुकाची ऑलिम्पिकवारी पक्की
Just Now!
X