06 March 2021

News Flash

उसेन बोल्टला करोनाची लागण

बोल्टने नुकताच त्याचा ३४वा वाढदिवस सुरक्षित अंतराचे कोणतेही नियम न पाळता मित्रमंडळींसोबत साजरा केला होता

उसेन बोल्ट

जमैकाचा जगातील सर्वोत्तम धावपटू उसेन बोल्टला करोनाची बाधा झाली आहे.

बोल्टने नुकताच त्याचा ३४वा वाढदिवस सुरक्षित अंतराचे कोणतेही नियम न पाळता मित्रमंडळींसोबत साजरा केला होता. त्यानंतरच बोल्टला करोना झाल्याचे सिद्ध झाले आहे. बोल्टच्या त्या वाढदिवसाच्या पार्टीत इंग्लंडचा अव्वल फुटबॉलपटू रहिम स्टर्लिगदेखील उपस्थित होता. बोल्टच्या वाढदिवसाच्या पार्टीत मोठय़ा संख्येने त्याची मित्रमंडळी उपस्थित होती आणि एकत्र जल्लोष करत होती. सध्या बोल्ट स्वयं-विलगीकरणात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2020 11:56 pm

Web Title: usain bolt infected with corona abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 १३ वर्षांच्या अथक मेहनतीचं फळ म्हणजे अर्जुन पुरस्कार – इशांत शर्मा
2 IPL स्पॉन्सरशिपमधून Future Group ची माघार
3 सचिन, विराटसाठी बॅट बनवणाऱ्या अश्रफ भाईंना सोनू सूदचा मदतीचा हात
Just Now!
X