News Flash

युसेन बोल्ट सलग तिसऱ्यांदा लॉरियस पुरस्काराचा मानकरी

जमैकाचा विख्यात धावपटू युसेन बोल्टने सलग तिसऱ्यांदा लॉरियसचा जगातील सर्वोत्तम क्रीडापटू बनण्याचा मान पटकावला. लंडन ऑलिम्पिकमध्ये १०० मीटर, २०० मीटर तसेच ४ बाय ४०० मीटर

| March 14, 2013 03:45 am

जमैकाचा विख्यात धावपटू युसेन बोल्टने सलग तिसऱ्यांदा लॉरियसचा जगातील सर्वोत्तम क्रीडापटू बनण्याचा मान पटकावला. लंडन ऑलिम्पिकमध्ये १०० मीटर, २०० मीटर तसेच ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदकांची नोंद करणाऱ्या बोल्टने दिग्गज खेळाडूंना मागे टाकत या पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली. ब्रिटनची हेप्टॅथलॉनपटू जेसिका इन्निस हिने जगातील सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार पटकावला. अमेरिकन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या ब्रिटनच्या अँडी मरेने ‘ब्रेक थ्रू’ पुरस्कारावर नाव कोरले. अद्वितीय कामगिरीबद्दलचा पुरस्कार अमेरिकेचा महान जलतरणपटू मायकेल फेल्प्स याला देण्यात आला. लंडन ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष सेबॅस्टियन कोए यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 3:45 am

Web Title: usain bolt third time loeries award winner
टॅग : Usain Bolt
Next Stories
1 अमृतप्रित उपांत्य फेरीत
2 जार्विसने उडवली वेस्ट इंडिजची दैना
3 मुंबईच्या अभिषेक नायरने टाकले एका षटकात १७ चेंडू
Just Now!
X