‘वेगाचा बादशहा’ उसेन बोल्टला यंदाच्या हंगामात अद्याप सूर गवसलेला नाही. पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी बोल्ट पात्र ठरला असला तरी कामगिरीत सातत्य आणण्यासाठी बोल्ट जमैका शर्यतीत सहभागी होणार आहे. १०० मीटर आणि २०० मीटर प्रकारात विश्वविक्रम नावावर असणाऱ्या बोल्टला सध्या पायाच्या आणि मांडीच्या स्नायूच्या दुखापतीने सतावले आहे. जमैका शर्यतीत बोल्टला असाफा पॉवेल आणि योहान ब्लेक यांचे आव्हान आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या न्यूयॉर्क डायमंड लीग शर्यतीत बोल्टने २०.२९ सेकंदांची वेळ नोंदवली होती. तंदुरुस्ती आणि सातत्य कमावण्यासाठी जमैका शर्यतीत सहभागी व्हावे लागेल असे बोल्ट म्हणाला होता.