28 November 2020

News Flash

उसेन बोल्टला १०० मीटरचे जेतेपद

लंडन ऑलिम्पिकमध्ये १०० व २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावणाऱ्या उसेन बोल्टने जमैकन अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद शर्यतीत जेतेपद मिळवत जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला.

| June 23, 2013 08:09 am

लंडन ऑलिम्पिकमध्ये १०० व २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावणाऱ्या उसेन बोल्टने जमैकन अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद शर्यतीत जेतेपद मिळवत जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला.
बोल्टने ६० मीटरनंतर आघाडी घेत अन्य स्पर्धकांना सहज मागे टाकले आणि ९.९४ सेकंद अशी वेळ नोंदवून सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याचा सहकारी केमर बेली कोलने ९.९८ सेकंदात ही शर्यत पूर्ण करत दुसरे स्थान पटकावले तर निकेल अ‍ॅशमिडी (९.९९ सेकंद) याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. असाफा पॉवेलने निराशा केली. त्याला हे अंतर पार करण्यास १०.२२ सेकंद वेळ लागला. आता जागतिक स्पर्धेत बोल्टला टायसन गे आणि गतविजेता योहान ब्लेक यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
पुरुषांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत लेफोर्ड ग्रीनने ४९.२० सेकंद अशी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. महिलांच्या १०० मीटर शर्यतीत केरॉन स्टुअर्टने शेरोन सिम्पसन हिच्यावर मात करत सुवर्णपदक जिंकले. तिला हे अंतर पार करण्यास १०.९६ सेकंद वेळ लागला. सिम्पसनला ११.०३ सेकंदासह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2013 8:09 am

Web Title: usain bolt wins 100m at jamaican trials for world champs
टॅग Usain Bolt
Next Stories
1 भारत-इंग्लंड अंतिम सामन्याचा ‘रविवार धमाका’
2 जागतिक हॉकी लीग: भारतीय महिला सातव्या स्थानावर चिलीवर २-१ने विजय
3 कोण होणार हिरवळीचा राजा
Just Now!
X