02 March 2021

News Flash

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : अक्षदीपच्या शतकामुळे उत्तर प्रदेश सुस्थितीत

मुंबईच्या आकाश पारकर आणि रॉयस्टन डायस यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

(संग्रहित छायाचित्र)

अक्षदीप नाथने साकारलेल्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर उत्तर प्रदेशने मुंबईविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी रविवारी ४ बाद २८१ अशी दमदार मजल मारली.

नाथ (२१५ चेंडूंत नाबाद ११५ धावा) आणि रिंकू सिंग (१३४ चेंडूंत नाबाद ७१ धावा) यांनी पाचव्या गडय़ासाठी १३७ धावांची अखंड भागीदारी साकारली. त्यामुळेच वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या ब-गटातील लढतीत उत्तर प्रदेशने ३ बाद ४८ अशा कठीण स्थितीतून ४ बाद २८१ अशी समाधानकारक मजल मारली. मुंबईच्या आकाश पारकर आणि रॉयस्टन डायस यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

महाराष्ट्राची पुन्हा हाराकिरी

गुवाहाटी : महाराष्ट्राच्या फलंदाजांनी पुन्हा हाराकिरी पत्करल्यामुळे आसामविरुद्धच्या रणजी करंडक सामन्यात पहिला डाव १७५ धावांत आटोपला. त्यानंतर आसामने १ बाद ७७ अशी दमदार मजल मारली.  रणजित माळी (५५ धावांत ४ बळी) आणि अरुप दास (६६ धावांत ४ बळी) यांनी महाराष्ट्राच्या फलंदाजांना खेळपट्टीवर स्थिरावूच दिले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2020 1:18 am

Web Title: uttar pradesh in good condition due to akshadeeps century abn 97
Next Stories
1 Ind vs Aus : शतकवीर ‘हिटमॅन’ची कर्णधार विराटशी बरोबरी
2 Ind vs Aus : ‘कॅप्टन कूल’चा विक्रम आता ‘किंग कोहली’च्या नावावर
3 Ind vs Aus : कांगारुंच्या शेपटावर शमीचा पाय, ४ बळी घेत दिग्गजांना टाकलं मागे
Just Now!
X