करोनाच्या साथीमुळे टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेपुढे अनिश्चिततेचे वातावरण पसरले आहे. मात्र आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांनी लस आणि वेगाने घेतल्या जाणाऱ्या करोना चाचण्या हे ऑलिम्पिक संयोजनासाठीचे उत्तर नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पुढील वर्षी २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या ऑलिम्पिकच्या दृष्टीने जपानमधील जनता अनुत्सुक आहे. ऑलिम्पिक स्पर्धा स्थगित करावी. कारण देण्याची आवश्यकता नाही, असे जपानमधील ऑलिम्पिक मंत्री सेइको हाशिमोटो यांनी गेल्या आठवडय़ात भाष्य केले होते. ‘आयओसी’च्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीनंतर बाख यांनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा प्रेक्षकांविना घेण्याचा प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले. ३२० दिवसांनंतर जागतिक स्थिती कशी असेल, हे आताच मांडणे कठीण आहे, असे त्यांनी सांगितले.