News Flash

वैदेही चौधरी अजिंक्य

स्पर्धेत अजिंक्यपद मिळविणारी वैदेही ही नाशिकची पहिलीच स्पर्धक आहे.

वैदेही चौधरी

जयपूर येथे आयोजित राष्ट्रीय कनिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेत तृतीय मानांकित नाशिकची वैदेही चौधरी अजिंक्य ठरली. या स्पर्धेत अजिंक्यपद मिळविणारी वैदेही ही नाशिकची पहिलीच स्पर्धक आहे.
वैदेहीने अंतिम सामन्यात चतुर्थ मानांकित आंध्र प्रदेशच्या एम. तनिष्कवर २१-१३, २१-१७ अशी मात केली. त्याआधी उपांत्य फेरीत प्रथम मानांकित आसामच्या अस्मिता छलियाचा २१-१५, २१-१६ असा पराभव केला. वैदेहीने याआधी १३, १५, १७ वयोगटांत राज्य अजिंक्यपद मिळविले आहे. येथील बीवायके महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेली वैदेहीने पाच वर्षे मकरंद देव यांच्याकडे, तर दीड वर्षांपासून ती नागपूर येथे जे. बी. वर्गीस यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 3:41 am

Web Title: vaidehi choudhary win in nationaljunior badminton championship
Next Stories
1 भारतीय संघाला बीसीसीआयकडून दोन कोटींचे बक्षिस
2 ‘आयपीएल’मध्ये पुणे आणि राजकोट संघाचा समावेश
3 वरुण अरोनच्या नेतृत्त्वात महेंद्रसिंग धोनी मैदानात उतरणार
Just Now!
X