वरद आठल्ये (कोल्हापूर), आदित्य नायर (मध्य महाराष्ट्र) व आदित्य मित्तल (मुंबई) यांनी सात वर्षांखालील गटाच्या राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेतील मुलांच्या गटात विजयी प्रारंभ केला.
पुणे जिल्हा चेस सर्कल व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेतील पहिल्या फेरीत पार्थ बागडे (पुणे), रुद्रनील जाधव (सातारा), कौस्तुभ माकोने (ठाणे),राहिल मल्लिक (मुंबई) यांनीही विजयी सुरुवात केली.
मुलींच्या विभागात कीर्ती पटेल, ध्रुवी कपाडिया, आज्ञा तेकुरकर (मुंबई) , संस्कृती वानखेडे (विदर्भ), अनया व्होरा, आदिती व्हावळ (पुणे) यांनी विजयी सुरुवात केली. या स्पर्धेतून आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी दोन्ही विभागातील प्रत्येकी पहिल्या दोन क्रमांकांच्या खेळाडूंना महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
पहिल्या फेरीचे निकाल-मुली- कीर्ती पटेल वि.वि. शरयु जोशी, ध्रुवी कपाडिया वि.वि. दिव्या अब्दियागिरे, समृद्धी कुलकर्णी वि.वि. मृण्मयी बागवे, सिया कुलकर्णी वि.वि. त्रिशा बेलितकर, तनिशा बोरामणीकर वि.वि. सई पाटील, आज्ञा तेकूरकर वि.वि. सृष्टी फुलझेले, संस्कृती वानखेडे वि.वि. मिताली इंगळे.