27 February 2021

News Flash

शिखर धवन अडचणीत, ‘त्या’ फोटोंमुळं होऊ शकते कारवाई

शिखर धवन यानं नियमाचं उल्लंघन केलं आहे.

भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज शिखर धवन सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असतो. तो आपल्या चाहत्यांबरोबर अनेक गोष्टी शेअर करत असतो. पण यामुळेच शिखर धवन अडचणीत सापडला आहे. वाराणसीत नावेतून फिरताना पक्षांना दाणे खाऊ घालतानाचा फोटो पोस्ट केल्यामुळे शिखर धवन अडचणीत सापडला आहे. शिखर धवन यानं शनिवारी आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत.

देशभरात विविध शहरात बर्ड फ्लूचं सावट आहे. बर्ड फ्लूचं संकट असताना पक्ष्यांना हाताळणं किंवा त्यांच्या संपर्कात येणं टाळावं असं प्रशासनाने बजावलं आहे. असं असताना शिखर धवनने पक्ष्यांना दाणे खाऊ घातल्यानं त्याच्यावर कारवाईची शक्यता आहे. शिखर धवन यानं इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केल्यानंतर ते लगेच व्हायरल झाले. व्हायरल झालेल्या फोटोनंतर स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची माहिती घेतली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, शिखर धवन याच्यावर कारवाईची शक्यता होऊ शकते. प्रशासन यावर गंभीर विचार करत आहे.

वाराणसी जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी सांगितलं की, शिखर धवन नावेतून विहारासाठी गेला होता. त्यावेळी त्यानं काही पक्षांना खाऊ घातलं. सध्या बर्ड फ्लूचं गंभीर संकट आपल्यासमोर उभं आहे. त्यामुळे परदेशी पक्ष्यांना दाणे खायला घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र शिखर धवनने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवरून फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तो पक्ष्यांना दाणे देताना दिसत आहे. या फोटोची आता चौकशी केली जात आहे. शिवाय त्या नाविकावरसुद्धा कारवाई सुरु केली जाणार आहे.


भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन सध्या वाराणसीत मुक्कामी आहे. यावेळी त्यानं बाबा विश्वनाथांचे दर्शन घेतले. तसंच गंगा आरतीही केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2021 9:40 am

Web Title: varanasi cricketer shikhar dhawan likely to face music for violating bird flu guidelines nck 90
Next Stories
1 Video : ऑस्ट्रेलियाला लोळवल्यानंतर अजिंक्य रहाणे म्हणाला….
2 IND vs ENG : लवकरच भेटू; बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर भारतात दाखल
3 कारकीर्द घडण्यात कुटुंबाचे पाठबळ मोलाचे!
Just Now!
X