03 December 2020

News Flash

रणजी करंडक विजेता विदर्भ संघ ठरला करोडपती

५ कोटींचं घसघशीत इनाम

सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या विदर्भाला त्यांच्या धडाकेबाज कामगिरीसाठी रोख रकमेचं इनाम घोषित करण्यात आलं आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनने ३ तर बीसीसीआयने विदर्भासाठी २ कोटी रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं आहे.

अवश्य वाचा – विदर्भ संघ रणजी स्पर्धेत विजयी हॅट्ट्रिक साधेल

अंतिम फेरीत विदर्भाने सौराष्ट्रावर ७८ धावांनी मात करत सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. पहिल्या हंगामात विदर्भाने दिल्लीवर मात करुन आपलं पहिलं विजेतेपद मिळवलं होतं. रणजी करंडकानंतर विदर्भाच्या संघासमोर आता इराणी करंडकाचं आव्हान असणार आहे.

अवश्य वाचा – रणजीच्या विजेतेपदाचाच ध्यास होता -पंडित

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2019 8:36 am

Web Title: vca announces rs 3 crore prize money for victorious vidarbha ranji squad
टॅग Vidarbha
Next Stories
1 विश्वचषकासाठी धोनीचं संघात असणं गरजेचं – युवराज सिंह
2 नेमबाज राहीच्या मार्गात सरकारी सेवानियमांचे अडथळे
3 जागतिक मल्लखांब स्पर्धा ध्वनिक्षेपकाशिवाय! 
Just Now!
X