ब्रिस्बेन : सात ग्रॅँडस्लॅम विजेती अमेरिकन टेनिसपटू व्हिनस विल्यम्सने ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेतली आहे.ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतून माघार घेतली असली तरी २० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत खेळण्याचा व्हिनसला विश्वास आहे. तसेच ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेआधी होणाऱ्या अ‍ॅडलेड आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत खेळण्याचा ३९ वर्षीय व्हिनसला विश्वास आहे.