News Flash

टीम इंडियाच्या लाडक्या ‘भज्जी’नं किचनमध्ये केली कमाल..! पाहा व्हिडिओ

आतापर्यंत २७ हजाराहून अधिक चाहत्यांनी हरभजनच्या व्हिडिओला दर्शवली पसंती

किचनमध्ये छोले बनवताना हरभजन सिंग

टीम इंडियाचा अनुभवी ऑफ स्पिनर हरभजन सिंग सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतो. चाहत्यांचा लाडका ‘भज्जी’ अनेक घटनांवर बिनधास्तपणे मतही देतो. क्रिकेटनंतर तो सिनेमातही झळकला. त्यामुळे अनेक क्षेत्रात तो उडी घेण्यात तो मागे-पुढे पाहत नाही. आता हरभजनने एक नवा व्हिडिओ शेअर करत सर्वांची मने जिंकली आहे. हरभजन आता शेफ झाला असून त्याने केलेली एक खास ‘डिश’ सर्वांसमोर आणली आहे.

हरभजनने एक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. यात तो त्याच्या किचनमध्ये ‘छोले’ बनवताना दिसत आहे. शिवाय, तो किचनमध्ये उभे राहून सर्व कामे स्वतः करताना दिसत आहे. ४० वर्षीय हरभजनने शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत २७ हजाराहून अधिक चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.

हेही वाचा – ३६ वर्षीय दिनेश कार्तिकला खेळायचेत दोन टी-२० वर्ल्डकप!

 

‘टर्बनेटर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरभजनने आपल्या कारकीर्दीत १०३ कसोटी, २३६ एकदिवसीय आणि २८ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तिन्ही फॉर्मेटमध्ये त्याच्या खात्यात ७००हून अधिक बळी जमा आहेत.

हेही वाचा – आपल्याच संघातील खेळाडूला ‘कानशिलात’ लगावलेल्या ३४ वर्षीय क्रिकेटपटूचं पुनरागमन!

हरभजन सिंग आणि आयपीएल २०२१

आयपीएलच्या १४व्या मोसमात हरभजन सिंग कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता. स्थगित झालेल्या यंदाच्या लीगमध्ये तो तीन सामने खेळला, पण त्याला एकही विकेट घेता आली नाही. आयपीएलमध्ये त्याने एकूण १५० बळी घेतले आहेत. यापूर्वी तो चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स संघाचा भाग राहिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 11:23 am

Web Title: veteran cricketer harbhajan singh shared his kitchen video of making chhole adn 96
Next Stories
1 ३६ वर्षीय दिनेश कार्तिकला खेळायचेत दोन टी-२० वर्ल्डकप!
2 आपल्याच संघातील खेळाडूला ‘कानशिलात’ लगावलेल्या ३४ वर्षीय क्रिकेटपटूचं पुनरागमन!
3 ‘‘सचिननं मला सामना गंभीरतेनं खेळू नकोस असं सांगितलं होतं”
Just Now!
X