ऑस्ट्रेलियन खुल्या अजिंक्यपद स्पध्रेत दोन वेळा जेतेपद पटकावणाऱ्या व्हिक्टोरिया अझारेन्काने एटीपी आणि डब्लूटीपी मियामी खुल्या टेनिस स्पध्रेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत तिने २४व्या मानांकित इंग्लंडच्या जोहाना कोंटावर ६-४, ६-२ असा विजय मिळवला. वर्षांच्या सुरुवातीला इंडियन वेल्स स्पध्रेचे जेतेपद पटकावणाऱ्या अझारेन्काला उपांत्य फेरीत अँजेलिक कर्बर आणि मॅडिसन की यांच्यातील विजेतीशी लाढावे लागेल. दुसऱ्या उपांत्य फेरीत दोन ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदे नावावर असलेल्या रशियाच्या स्वेतलाना कुझनेत्सोव्हा आणि स्वित्र्झलडची तिअेमा बॅसिनझस्की आमने सामने आहेत. अझारेन्काने २००९ आणि २०११मध्ये मियामी स्पध्रेत बाजी मारली होती.