25 September 2020

News Flash

सांघिक कामगिरीचा विजय -पाटील

भारतीय संघाने २८ वर्षांनंतर लॉर्ड्सवर विजय मिळवल्यावर राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी संघाचे अभिनंदन केले आहे.

| July 23, 2014 04:19 am

भारतीय संघाने २८ वर्षांनंतर लॉर्ड्सवर विजय मिळवल्यावर राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी संघाचे अभिनंदन केले आहे. या वेळी एखाद-दुसऱ्या खेळाडूला यशाचे श्रेय न देता त्यांनी विजयाचे श्रेय सांघिक कामगिरीला दिले आहे.
‘‘लॉर्ड्सवरील विजय थरारक होता. ही फक्त सुरुवात असून अजून बरीच कामे करायची बाकी आहेत. हा युवा संघ असून त्यांना अजून बरेच काही शिकायचे आहे. गेल्या वर्षी सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर संघापुढील आव्हान अजून वाढले आहे,’’ असे पाटील यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2014 4:19 am

Web Title: victory of group performance
टॅग Sandeep Patil
Next Stories
1 शारापोव्हा ओळखत नाही यात अपमानास्पद काहीच नाही- सचिन
2 क्रिकेटच्या पंढरीत भारताचा ऐतिहासिक विजय
3 कपिलच्या पराक्रमामुळे लॉर्ड्सवर इतिहास घडला!
Just Now!
X