लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या सायना नेहवालने आता आशियाई, ऑल इंग्लंड आणि जागतिक बॅडमिंटन स्पध्रेत अिजक्यपद मिळविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.
बॅडमिंटनमधील चीनची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी देशात खेळाच्या पायाभूत सुविधा विकसित करणे आवश्यक आहे, असे मत सायनाने व्यक्त केले.
सहारा कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सायना बोलत होती. सायना सहारा कंपनीशी करारबद्ध झाली असून, यापुढे खेळताना सहाराचे बोधचिन्ह तिच्या पोशाखावर असेल.
बॅडमिंटनच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे वेळापत्रक अतिशय व्यस्त असते. त्यामुळे एखाद्या खेळाडूला सातत्याने चांगली कामगिरी करीत राहणे, हे अत्यंत अवघड असते, असे सायनाने सांगितले.