20 September 2020

News Flash

आनंदविरुद्ध विजय हा कारकीर्दीतील सर्वोत्तम क्षण -विदित

२५ वर्षीय विदित २०१३ मध्ये ग्रँडमास्टर झाला, त्यानंतर २०१९मध्ये त्याने आनंदला नमवण्याची किमया साधली होती.

(संग्रहित छायाचित्र)

 

पाच वेळा विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदविरुद्धचा विजय हा कारकीर्दीतील सर्वोत्तम क्षण असल्याचे बुद्धिबळ ऑलिम्पियाड सुवर्णपदक विजेत्या भारताचा कर्णधार विदित गुजराथीने म्हटले आहे.

२५ वर्षीय विदित २०१३ मध्ये ग्रँडमास्टर झाला, त्यानंतर २०१९मध्ये त्याने आनंदला नमवण्याची किमया साधली होती. यासंदर्भात विदित म्हणाला, ‘‘आनंदविरुद्ध खेळण्याचा अनुभव माझ्यासाठी बरेच काही शिकणारा होता. मी भारतातील सर्वोत्तम पाच बुद्धिबळपटूंमध्ये गणला जात होतो. तरी आनंदविरुद्ध खेळण्याची संधी फारशी मिळाली नव्हती. २०१८ मध्ये मी पहिल्यांदा आनंदशी सामना केला. त्यावेळी त्याची बलस्थाने आणि कमकुवतपणाचा अंदाज घेतला. त्याचाच उपयोग मला २०१९ च्या विजयात झाला.’’

भारताने नुकतेच रशियासह बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे संयुक्त विजेतेपद पटकावले. विदितच्या नेतृत्वाखालील संघात आनंद, महिला ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी यांचा समावेश होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2020 12:15 am

Web Title: victory over viswanathan anand is the best moment of his career abn 97
Next Stories
1 क्रिकेट पूर्वपदावर येण्यास सज्ज, ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड मालिकेत प्रेक्षकांना मैदानात परवानगी
2 Video : काही कळायच्या आतच फिंचची दांडी गुल, ख्रिस वोक्सचा भन्नाट चेंडू पाहिलात का??
3 कांगारुंची हाराकिरी, इंग्लंडविरुद्ध हातातला सामना गमावला
Just Now!
X