विदर्भाने सलग दुसऱ्यांना रणजी करंडक स्पर्धेचं विजेतेपद पटावत, स्थानिक क्रिकेटमध्ये आपलं महत्व अधोरेखित केलं आहे. फैज फजलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या विदर्भाने सौराष्ट्रावर 78 धावांनी मात करत मानाचा रणजी करंडक पटकावला. फिरकीपटू आदित्य सरवटेने दुसऱ्या डावात 6 फलंदाजांना माघारी धाडत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने सामन्यात 11 बळी घेतले. या धडाकेबाज कामगिरीसह विदर्भाचा कर्णधार फैज फजलने दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे.

अवश्य वाचा – बाप्पा, पोट्टे जिंकले ना ! विदर्भ सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक विजेता

फैज फजल सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक पटकावणारा 11 वा फलंदाज ठरला आहे. या कामगिरीसह फजलने प्रो. डी. बी. देवधर, बापू नाडकर्णी आणि अजित वाडेकर यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे.

विदर्भाने विजयासाठी दिलेलं 207 धावांचं आव्हान पार करताना सौराष्ट्राचा संघ 127 धावांपर्यंतच मजल मारु शकला. फिरकीपटू आदित्य सरवटेने विदर्भाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याला अक्षय वाखरेने 3 तर उमेश यादवने 1 बळी घेत चांगली साथ दिली.