प्रथम फलंदाजी करताना अवघ्या १६३ धावांमध्ये कोसळल्यानंतर विदर्भ संघापुढे पराभवाची छाया निर्माण झाली होती मात्र त्यांच्या गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्यामुळेच त्यांनी विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत दिल्लीवर १८ धावांनी सनसनाटी मात केली.

संक्षिप्त धावफलक- विदर्भ ४५.२ षटकांत सर्व बाद १६३ (फैज फाजल ८३, एस.बद्रीनाथ २०, अक्षय वाडकर २०, रवी जांगिड १७, इशांत शर्मा ५/२१, नवदीप सैनी २/४३, सुबोध भाटी २/२१) वि.वि. दिल्ली ४५.१ षटकांत सर्व बाद १४५ (उनमुक्त चंद ५७; उमेश यादव २/३९, अक्षय कर्णेवार २/१७, अक्षय वाखरे २/१०).