News Flash

आदित्य सरवटेची अष्टपैलू चुणूक

५८ धावांत ४ बळी घेत राजस्थानची दुसऱ्या डावात ९ बाद २२६ अशी अवस्था केली.

*  विदर्भाचा डाव २४७ धावांत आटोपला * राजस्थान दुसऱ्या डावात ९ बाद २२६
विदर्भाच्या आदित्य सरवटेच्या अष्टपैलू कामगिरीची चुणूक मंगळवारी रणजी करंडक स्पध्रेत विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पाहायला मिळाली. आधी सरवटेच्या अर्धशतकाच्या बळावर विदर्भाने पहिल्या डावात २४७ धावा उभारल्या. मग त्याने ५८ धावांत ४ बळी घेत राजस्थानची दुसऱ्या डावात ९ बाद २२६ अशी अवस्था केली.
विदर्भाने ६ बाद २०२ धावसंख्येवरून आपल्या पहिल्या डावाला पुढे प्रारंभ केला, परंतु ९९.३ षटकांत २४७ धावांत त्यांचा पहिला डाव आटोपला. आदल्या दिवसाचा नाबाद फलंदाज सरवटेने ८ धावांची भर घालून अर्धशतक साजरे केले. मात्र तन्वीर उल हकने त्याला बाद केले. रवी जांगीडने ३६ धावा केल्या.
मग राजस्थानची दुसऱ्या डावात २ बाद ४० अशी अवस्था झाली. पण विनित सक्सेना आणि अशोक मेनारिया (७६) यांनी ११० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यामुळे विदर्भाला दीडशे धावांपर्यंत मजल मारता आली. खेळ थांबला, तेव्हा के. अजय सिंग आणि अंकित चौधरी अनुक्रमे २१ आणि २ धावांवर खेळत होते. राजस्थानकडे आता १९५ धावांची आघाडी आहे.

संक्षिप्त धावफलक
राजस्थान (पहिला डाव) : २१६ विदर्भ (पहिला डाव) : ९९.३ षटकांत सर्व बाद २४७ (आदित्य सरवटे ५०; तन्वीर उल हक ४/६०) राजस्थान (दुसरा डाव) : ७८ षटकांत ९ बाद २२६ (अशोक मेनारिया ७६; आदित्य सरवटे ४/५८)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2015 12:55 am

Web Title: vidarbha vs rajasthan ranji trophy 2015 16 group a match day 3 at nagpur
Next Stories
1 ‘तळवलकर क्लासिक’ शरीरसौष्ठव स्पर्धा डिसेंबरमध्ये रंगणार
2 त्रिपाठीच्या शतकासह महाराष्ट्राचे दमदार उत्तर
3 राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा : महेंद्र, किशोरीकडे महाराष्ट्राची धुरा
Just Now!
X