28 September 2020

News Flash

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : विदर्भाचा पहिला विजय

ललित यादवच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर विदर्भाने छत्तीसगड विरुद्ध रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला.

(संग्रहित छायाचित्र)

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा

छत्तीसगडचा १० गडी राखून धुव्वा

ललित यादवच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर विदर्भाने छत्तीसगड विरुद्ध रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. केवळ शंभर धावांची आघाडी घेत विदर्भाने डाव घोषित केला आणि ललित यादवने सात गडी बाद करून छत्तीसगडला १४३ धावांवर गुंडाळले. मिळालेले ४४ धावांचे विजयी लक्ष्य विदर्भाने १० गडी राखून पार करत विजय नोंदवला.

रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शनिवारी विदर्भाने रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेत यंदाच्या हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला. गोलंदाजांवर आत्मविश्वास ठेवत विदर्भाने ६ बाद ३३२ धावा करून छत्तीसगडला तिसऱ्याच दिवशी फलंदाजीला आमंत्रित केले आणि दिवसअखेर चार गडी बादही केले. अखेरच्या दिवशी खेळ सुरू झाला तेव्हा छत्तीसगड चार बाद २८ धावांवर होता. अमनदीप खरे तीन तर शकीब अहमद शून्यावर असताना डावाला सुरुवात झाली आणि ललित यादवने अमनदीपला पाच धावांवर पायचीत केले. त्यानंतर शकीब आणि मनोजसिंगने धावफलक हलता ठेवत धावसंख्या वाढवली. मात्र ललितने मनोजसिंगला ३० धावांवर बाद केले. त्यानंतर मनोजसिंगलाही ललित यादवने (३०) झेलबाद केले. विशाल सिंग ११ बाद झाला तेव्हा छत्तीसगड ८ बाद १३१ धावांवर होता. त्यामुळे सामन्यात विदर्भाने वर्चस्व स्थापित करत इतरही फलंदाजांना झटपट बाद केले आणि केवळ १४३ धावांवर रोखले. दरम्यान, विदर्भाला विजयासाठी ४४ धावांचे लक्ष्य मिळाले. फलंदाजीत बदल करत विदर्भाने तिन्ही सामन्यांत अपयशी ठरलेल्या आर. संजयला न पाठवता फॉर्मात असलेल्या अक्षय वाडकरला फैज फजलसोबत पाठवले. दोघांनी संयम आणि सावध फलंदाजी करत विदर्भाला विजयी लक्ष्य गाठून दिले. फैजने नाबाद २० तर अक्षयने नाबाद २५ धावा केल्या. विदर्भाने कोणताही गडी न गमवता ४६ धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केला आणि सात गुणांची कमाई केली. तब्बल तीन साखळी सामन्यांत विजयापासून वंचित विदर्भाला चौथ्या सामन्यात विजय नोंदवला. विदर्भाचा पुढील सामना १४ डिसेंबरला रेल्वेविरुद्ध दिल्लीच्या कन्रेलसिंग स्टेडियमवर आहे.

संक्षिप्त धावफलक

छत्तीसगड (पहिला डाव) : २३२

विदर्भ (पहिला डाव) : ६ बाद ३३२ घोषित

छत्तीसगढ (दुसरा डाव) : ५७ षटकांत १४३ (शकीब अहमद ३१, मनोजसिंग ३०, सुमित रुईकर ३९; ललित यादव ७/५६, यश ठाकूर २/३३).

विदर्भ (दुसरा डाव) : १९.२ षटकांत बिनबाद ४६ (अक्षय वाडकर नाबाद २५, फैज फजल नाबाद २०).

सामनावीर : ललित यादव

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2018 2:36 am

Web Title: vidarbhas first victory
Next Stories
1 Mens Hockey World Cup 2018 : भारतापुढे आता बेल्जियमचे आव्हान
2 स्लोव्हेनियाच्या तामराची विजेतेपदाला गवसणी
3 भारताची सध्याची गोलंदाजी सर्वोत्तम -लॉसन
Just Now!
X