पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडवर सहा विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे पाकिस्तानी चाहते सामना संपल्यानंतर आनंदी होते. पण या सामन्यात पाकिस्तानी चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणाराही एक क्षण आला होता.

सामना सुरु असताना पाकिस्तानची फलंदाजी सुरु होती. १२ षटकांचा खेळ झाला होता. ३८ षटकांमध्ये पाकिस्तानला १५६ धावा हव्या होत्या. पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हक १६ धावांवर खेळत होता. त्यावेळी न्यूझीलंडचा गोलंदाज लॉकी फर्ग्युसनचा एक चेंडू इमामच्या हॅल्मेटच्या जाळीवर आदळला. त्यानंतर इमाम थेट जमिनीवर कोसळला. त्यावेळी सर्वच त्याच्याजवळ धावत गेले. अखेर पाकिस्तानचे फिजिओ यांनी त्याला मैदानाबाहेर नेले.

हा पहा व्हिडिओ –

दरम्यान, सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर २१० धावांचे माफक आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने ६ गडी राखून हा सामना सहज जिंकला.