ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर बॉलिवूडच्या गाण्यांवर डान्स करताना अनेकदा दिसला आहे. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने आपलं दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीवर असलेलं प्रेमदेखील दाखवून दिलं. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील स्टार अभिनेत्यांच्या गाण्यावर त्याने डान्स केला होता. त्यानंतर आता भारतीय संघातील खेळाडू साऊथस्टार विजयच्या गाण्यावर थिरकताना दिसले.
View this post on Instagram
तमिळ सुपरस्टार थलपती विजय याच्या प्रसिद्ध ‘वाथी कमिंग’ गाण्यावर या भारतीय क्रिकेटपटूंनी ठेका धरला. भारताचा अनुभवी फिरकीपटू अश्विनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अश्विनसह अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि फिरकीपटू कुलदीप यादव हेदेखील विजयच्या ‘वाथी कमिंग’ स्टेपची नक्कल करताना दिसत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 20, 2021 12:17 pm