इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत १-०ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने पुढील दोन सामन्यात दमदार पुनरागमन केलं. दुसरा आणि तिसरा कसोटी सामना जिंकून भारताने मालिकेत २-१ची आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत इंग्लंडच्या संघाला विजय मिळवणं अनिवार्य आहे. तर विश्व अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे किंवा अनिर्णित राखणे महत्त्वाचे आहे. अशातच भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

ICC Test Rankings: रोहित शर्माची ‘टॉप १०’मध्ये धडक

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने चौथ्या आणि शेवटच्या कसोटीतून माघार घेतली आहे. काही वैयक्तिक कारणांसाठी चमूतून आणि बायो-बबलमधून बाहेर जाण्याची परवानगी द्यावी अशी विनंती बुमराहने बीसीसीआय व्यवस्थापनाला केली होती. त्यानुसार त्याला संघातून रिलीज करण्यात आले आहे, अशी माहिती ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आली आहे. बुमराहच्या जागी कोणत्याही बदली खेळाडूला चमूत समाविष्ट करून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याच्याजागी हार्दिक पांड्याला संघात मिळणार असल्याची चर्चा असतानाच पांड्याचा एक झेल घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

चौथ्या कसोटीला ४ मार्चपासून सुरूवात होणार आहे. या कसोटीआधी सराव सत्रात हार्दिक क्षेत्ररक्षणाचा सराव करत होता. त्यावेळी हवेत वेगाने जाणारा चेंडू झेलण्यासाठी त्याने उडी मारली आणि भन्नाट झेल टिपला.