18 October 2019

News Flash

Video : ‘हा’ रनआऊट पाहिल्यावर तुम्हांला हसू नाही आवरणार…

चेंडू विकेट किपरकडे पोहोचणार इतक्यात...

क्रिकेट हा खेळ नेहमीच काही ना काही नव्या घटना घडवत असतो. क्रिकेटमध्ये अनेकदा आश्चर्यकारक गोष्टी घडत असतात. गोलंदाज अनेकविध प्रकारे बाद होत असतात. एखाद्या चांगल्या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर फलंदाज बाद होते, तर कधी उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे फलंदाजाला माघारी परतावे लागते. पण सध्या एका वेगळ्याच प्रकारच्या रनआऊटचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो आहे. फलंदाजाचे खेळात लक्ष नसल्याने तो रनआऊट झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू मार्क कॉसग्रोव्ह याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मार्क ज्या प्रकारे रनआऊट झाला आहे, ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. इंग्लंड काऊंटी क्रिकेटच्या डिव्हिजन २ मध्ये लिस्टरशायर आणि ग्लॅमॉर्गन यांच्यात झालेल्या सामन्यात क्रॉसग्रोव्ह फलंदाजी करत होता. पहिल्या डावात खातं न उघडता तो शून्यावर बाद झाला होता. दुसऱ्या डावात खेळताना तो मजेशीर पध्दतीने बाद झाला.

या व्हिडीओत कॉसग्रोव्ह याने चेंडू फलंदाजाच्या अगदी जवळ असलेल्या फॉरवर्ड शॉर्ट लेगवरील क्षेत्ररक्षकाकडे टोलवला. त्या क्षेत्ररक्षकाने चेंडू आडवला. पण खेळाकडे थोडेसे दुर्लक्ष झालेल्या त्या फलंदाजाने त्यातही धाव घेण्याचा प्रयत्न केला. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातातच होता, तरीही त्याने धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नात तो रनआऊट झाला.

कॉसग्रोव्हचा या आधीदेखील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. यात कॉसग्रोव्हने चेंडूला डोक्याने स्लिपमध्ये शॉट मारला होता. आता त्याचा अजब प्रकारे रनआऊट होण्याचा व्हिडिओ सर्वांच्या विचारा पलीकडचा आहे.

First Published on September 21, 2019 4:04 pm

Web Title: video hilarious run out forward short leg county cricket leicestershire cricket vjb 91