भारतीय संघ बुधवारपासून (२३ जानेवारी) न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ५ एकदिवसीय सामने आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका टीम इंडियाने २-१ ने जिंकली. या संपूर्ण दौऱ्यातीलच नव्हे, तर पूर्ण वर्षभरातील सर्वात आवडता क्षण सांगितला आहे.
BCCI ने ट्विटर हँडलवर विराटचा व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडिओत त्याने गेल्या वर्षभरातील आवडता क्षण सांगितला आहे. हा पाहा खास व्हिडीओ –
It is a clean sweep for @imVkohli at the #ICCAwards. Here’s the #TeamIndia captain reflecting on an outstanding 2018 and looking forward to an even better 2019
Full video Link https://t.co/X6eRPmmrse pic.twitter.com/2tLBvmEhzK
— BCCI (@BCCI) January 22, 2019
‘ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत अॅडलेडच्या मैदानावर मिळवलेला विजय हा माझ्यासाठी विशेष होता. तसेच मेलबर्नवरील विजयही माझ्या आवडत्या क्षणांपैकी एक आहे, असे उत्तर त्याने दिले.
दरम्यान, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये ५ एकदिवसीय आणि तीन टी२० सामने खेळणार आहे. बुधवारपासून दोन देशांमधील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार असून आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघाचा हा दौरा अंत्यत फायद्याचा असणार आहे. या दौऱ्यात हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांना बंदीमुळे संघाबाहेर करण्यात आले आहे. त्यांच्या अनुपस्थितीत नवोदित विजय शंकर व शुभमन गिल काय कमाल करतात, हे पाहणेदेखील महत्वाचे ठरणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2019 6:47 pm