तो खेळायला लागला की गोलंदाज मती गमावून बसतो, प्रेक्षक त्याचे फटके पाहत बसून आनंद लूटतात आणि संघ सहकारी विजयाच्या आनंदात न्हाऊन निघतात, हे चित्र पुन्हा एकदा दाखवून दिले ते वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज किरॉन पोलार्डने. ताबडतोब आणि तुफान फटकेबाजीची ओळख असलेल्या पोलार्डने गुरूवारपासून सुरू होणाऱया ऑस्ट्रेलियन टी-२० ‘बिग बॅश लीग’च्या सराव सामन्यात एका षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रम गाजवला.
याआधी भारताच्या युवराज सिंगची इंग्लंडविरुद्धची सहा षटकारांच्या आतिषबाजी खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. युवीच्या या विक्रमाची कोणी बरोबरी करेल अशी शक्यता वाटत नसताना २०१२ साली एका टी-२० स्पर्धेत एका षटकात पाच षटकार ठोकून किरॉन पोलार्ड युवीचा विक्रमाशी बरोबरी करण्यास केवळ एका षटकाराने हुकला होता. परंतु, यावेळी किरॉनने एका षटकात सहा षटकार ठोकून आपल्यात प्राबल्य असल्याचे दाखवून दिले. पण, हे षटकार किरॉनने सराव सामन्यात ठोकले आहेत. सराव सामन्यातच किरॉनने ‘षटकार’ फलंदाजी केल्यामुळे आता खऱया स्पर्धेबाबतची उत्सुकता शीगेले पोहोचली आहे.
व्हिडिओ: पोलार्डचे एका षटकात सहा षटकार

व्हिडिओ: २०१२ साली एका षटकाराने हुकलेला पोलार्डचा विक्रम (६,६,६,६,०,६)


Keiron Pollard 56 Runs in 15 balls by cricketinfoo