News Flash

IND vs AUS VIDEO: नेट्समध्ये केएल राहुलची धडाकेबाज फलंदाजी

पाहा व्हिडीओ

IPL चा हंगाम संपल्यानंतर आता साऱ्यांना भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेचे वेध लागले आहेत. टीम इंडिया काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाली असून नियमांनुसार क्वारंटाईनमध्ये आहे. मात्र मर्यादित ठिकाणी सराव करण्यास खेळाडूंना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे काही दिवस विश्रांती घेतल्यावर सर्व खेळाडू मैदानावर सरावासाठी उतरल्याचे दिसून आले. IPL 2020 मध्ये सर्वाधिक धावा ठोकत ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलेल्या लोकेश राहुलने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, त्यात तो विविध गोलंदाजांच्या गोलंदाजीवर फटकेबाजीचा सराव करताना दिसतो आहे.

पाहा व्हिडीओ-

भारताविरूद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ अनवाणी

भारताविरुद्धच्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ अनवाणी मैदानावर उतरणार असल्याचं कर्णधार टीम पेनने सांगितलं. “जगभरातील वर्णभेदाचा निषेध करण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाने हा निर्णय घेतला आहे. आम्ही अनवाणी मैदानात उतरून गोलाकार उभे राहू. प्रत्येक मालिकेच्या सुरुवातीला आम्ही असं करणार आहोत. वर्णभेदाचा निषेध करण्यासाठी आम्ही असं करणार आहोत. या आधी आम्ही याची सुरुवात करू शकलो नाही पण आता आम्ही हे नक्की करणार आहोत. हा वर्णभेदाचा निषेध करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न असेल”, असे टीम पेनने स्पष्ट केलं.

टीम इंडिया एकदिवसीय संघ- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक)

वन-डे मालिका

पहिला वन-डे सामना – २७ नोव्हेंबर – सिडनी
दुसरा वन-डे सामना – २९ नोव्हेंबर – सिडनी
तिसरा वन-डे सामना – १ डिसेंबर – मनुका ओव्हल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 4:53 pm

Web Title: video kl rahul net practice big hitting fours and sixes ind vs aus team india australia tour watch vjb 91
Next Stories
1 जाणून घ्या टीम इंडियाचं २०२१ चं वेळापत्रक…
2 जीवे मारण्याची धमकी मिळालेल्या क्रिकेटपटूने स्वत:च मागितली माफी, कारण…
3 श्रेयस अय्यरमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करण्याचे गुण आहेत !
Just Now!
X